जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा शोध

जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा शोध

उपमहानिरीक्षकांचे आदेश: कडक कारवाईच्या सूचना

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedagar

नाशिक (Nashik) परिक्षेत्रामध्ये मध्यप्रदेश (MP), उत्तप्रदेश (UP) राज्यातून येणाऱ्या गावठी कट्ट्यांना (Gavathi Katta) आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (Deputy Inspector General of Police Dr. B. G. Shekhar Patil) यांनी नगरमध्ये (Ahmednagar) बोलताना सांगितले.

राहुरी (Rahuri) तालुक्यातील डिग्रस (Digras) येथे आरोपीने दोन गावठी कट्ट्यांचा (Gavathi Katta) वापर करून कुटुंबास वेठीस धरले होते. त्याच्याकडून हे कट्टे जप्त करण्यात आले आहेत. या घटनेनंतर डॉ. शेखर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या. यानंतर आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, गावठी कट्ट्याचे तरुण वर्गाला जास्त आकर्षण आहे. त्यांच्या हाती हे कट्टे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातून येतात. ठराविक एजंट त्याची विक्री करतात. गुन्हे करण्यासाठी अलीकडच्या काळात जास्त. गावठी कट्ट्यांचा वापर होत आहे. महिनाभरात नाशिक परिक्षेत्रामध्ये २७ गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत.

नगर जिल्ह्यात पाच गावठी कट्टे व तीन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. गावठी कट्टे शोध मोहीम राबविताना मागील पाच वर्षांमध्ये कोणत्या गुन्ह्यात गावठी कट्ट्यांचा वापर झाला याचे रेकॉर्ड काढण्यात येणार आहे. परराज्यातून येणाऱ्या कट्ट्यांविषयी माहिती हाती लागली असून ते जिल्ह्यात येणार नाही, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.