टॉवर कंपनीची मालमत्ता सील

टॉवर कंपनीची मालमत्ता सील

अहमदनगर (प्रतिनिधी)

मालमत्ता कर थकीत असल्याने मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई महापालिकेने केली आहे. 29 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

वॉर्ड क्रमांक 42 मधील अक्षय बिल्डिंगवर इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीची टॉवर मालमत्ता सील करण्यात आली. मालमत्ता करा पोटी 15 लाख 18 हजार 245 रूपये थकबाकी होती.

कारवाई प्रभाग अधिकारी सुनील. बी. साठे व प्रभारी कर निरीक्षक एस. के. दगडे व कर्मचारी शाम सुदाम शिंदे, इरफान सय्यद व अशोक गुलदगड यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com