समुद्राला जाणारे पाणी वळविण्यासाठी लक्ष घाला

विरोधी पक्षनेत्यांकडे मागणी
समुद्राला जाणारे पाणी वळविण्यासाठी लक्ष घाला

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

सह्याद्री घाटमाथ्यावरील समुद्राला जावून मिळणारे हजारो टीमएसी पाणी वळविण्याच्या प्रश्नावत आपण लक्ष घालावेव प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी उस्थळदुमाला येथील शेतकरी व भ्रष्टाचार व काळापैसा विरोधी भारतीय जनसंसदचे तालुकाध्यक्ष रामराव भदगले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले की, आपण मुख्यमंत्री असताना सभेमध्ये समुद्राला वाया जाणारे पाणी अडवून महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात गोदावरी खोर्‍यात बोगद्याद्वारे वळविण्याबाबत बोलले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्तत्कालीन जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनीही माझ्यासारख्या सामान्य शेतकर्‍याच्या निवेदनाची दखल घेवून महाराष्ट्र सरकारला जलसंधारण खात्याला आदेश देवून सूचना केली व त्याबद्दल कार्यवाहीचा अहवाल मागितला.

अनेकवेळा महाराष्ट्र सरकारला निवेदने पाठविली. मात्र त्याची दखल घेतली नाही. महाराष्ट्र सरकारला जलसंधारण खात्याला केंद्र सरकारने चार पत्राद्वारे कार्यवाही सांगून चार पत्राच्या प्रती मला माहितीसाठी पाठविल्या. हा प्रश्न पद्भूषण स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी सलग 30 वर्षे केंद्रसरकारकडे मांडला होता. परंतु तत्कालीन केंद्रसरकारने या प्रश्नाची दखल घेतली नाही. तरी आपण या प्रश्नात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com