पैशाच्या कारणातून एकावर कोयत्याने हल्ला

हातवळण येथील घटना, दोघांवर गुन्हा
पैशाच्या कारणातून एकावर कोयत्याने हल्ला

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - पैसे देण्याघेण्याचे कारणातून एकावर दोघा जणांनी कोयता, दगडाने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नगर तालुक्यातील हातवळण शिवारात रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेची फिर्याद मंगळवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

या हल्ल्यात परसराम दशरथ नवसुपे (वय 35 रा. मठपिंप्री ता. नगर) हे जखमी झाले आहेत. त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी विश्‍वनाथ चेमटे (रा. हातवळण) व नामदेव निकम (पूर्ण नाव माहिती नाही रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

परसराम नवसुपे व आरोपी यांच्यामध्ये जनावराच्या गोठ्यात मुरूम टाकण्यासाठी पैशाचा व्यवहार झाला होता. याच कारणातून रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवाजी चेमटे याने हातातील कोयत्याने परसराम यांच्या पाठीमागून डोक्यात वार केला. तसेच नामदेव निकम याने परसराम यांच्या पाठीत दगड मारला. या मारहाणीत परसराम नवसुपे जखमी झाले आहेत. जखमी नवसुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com