भरधाव स्कॉर्पिओ गाडी घुसली हॉटेलमध्ये

एक जखमी, हॉटेलचे मोठे नुकसान
भरधाव स्कॉर्पिओ गाडी घुसली हॉटेलमध्ये

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. तसेच हॉटेलचे मोठे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी कल्याण - निर्मल (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गावर कोरडगाव शिवारात विजय लॉन्स जवळ घडली.

त्यागराज रामकृष्ण नाडार (31, रा. पनवेल जि. नवी मुंबई) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरून स्कॉर्पिओ चालक सुनील पाखरे (रा. पिंपळगव्हाण ता.पाथर्डी) याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी शहरालगतच असलेल्या राष्ट्रीय महामार्गला लागून पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल समृद्धी आहे.

आज दुपारी भरधाव आलेली स्कॉर्पिओ गाडी (क्र. एम.एच.16 सी.क्यु. 5724) हि भरधाव वेगात हॉटेलमध्ये घुसली. यावेळी नाडार हे चहा पीत होते. सुदैवाने हॉटेलमध्ये इतर जादा ग्राहक नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. स्कॉर्पिओ चालक पाखरे हा जखमीला कुठलीही मदत न करता तेथून पळून गेला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला सुनील पाखरे या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com