सोमवारपासून सकाळीच शाळा!

सोमवारपासून सकाळीच शाळा!

अहमदनगर (प्रतिनिधी)

वाढत्या उन्हाचा कडाका लक्षात घेऊन नगर (Ahmednagar) जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची (School) वेळ सोमवार (दि. ४) पासून सकाळची करण्यात आली आहे. सकाळी सात ते दुपारी साडेबारा या वेळेत जिल्ह्यातील सर्व शाळा भरणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आणि सल्लागार समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुका स्तरावरून गटशिक्षणाधिकारी हे देखील सल्लागार समितीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.

नगरसह राज्यात उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक आणि सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते ९ वी आणि ११ वीच्या सर्व शाळांची वेळ बदलण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांसह गुरुकुल शिक्षक मंडळ आणि शिक्षक समन्वय समितीची होती. सध्या उष्णतेची लाट असून सकाळी १० पासून सुर्य आग ओकत आहे. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने झेडपीच्या शाळांची वेळ बदलण्याची होत होती.

सोमवारपासून सकाळीच शाळा!
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

शुक्रवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे आणि सल्लागार समितीच्या सदस्यांची बैठक झाली. यात सोमवारपासून सकाळी सात ते दुपारी साडेबारा या वेळेत जिल्ह्यातील शाळा भरणार आहेत. या कालावधीत पाच तास अध्यापन होणार असून जेवणाची सुट्टी अर्ध्या तासाची राहणार आहे. शाळा सुटल्यानंतर दुपारी दोन चार विद्यार्थ्यांना घरी जाता येणार आहे. दरम्यान, शाळेची वेळ जरी बदलली असली तरी शिक्षकांना दुपारच्या वेळेत पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने जाता येणार आहे. विनापरवानगी जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी जाणाऱ्या शिक्षकांवर अथवा शिक्षक नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांनी दिले आहेत. तसेच गटशिक्षणाधिकारी जास्तीत जास्त शाळा भेटी देऊन सकाळच्या वेळेत शिक्षक शाळेत वेळेवर आहेत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात सर्वसाधारणपणे मार्चपासून जिल्ह्यातील शाळांची वेळ बदलण्यात येते. या शैक्षणिक वर्षात मार्चऐवजी एप्रिलपासून सर्व शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. तसेच आता शनिवारी देखील पूर्ण वेळ शाळा सुरू राहणार असून रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा ठेवता येणार आहे. तसेच पहिले ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा चालू महिन्यांच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यांत जाहीर करण्यात यावा. दररोज १०० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थितीला देखील परवागनी देण्यात आली आहे.

सोमवारपासून सकाळीच शाळा!
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

शाळांच्या नवीन वेळापत्रकात सकाळी ७.७१० परिपाठ, ७.१० ते ७.५० पहिला तास, ७.५० ते ८.२५ दुसरा तास, ८.२५. ते ९ वाजेपर्यंत तिसरा तास, ९ ते ९.३५ चौथा तास आणि त्यानंतर दहा मिनीटांची मधील सुट्टी, त्यानंतर पाच ते आठपर्यंतच्या तासीका पूर्ण करून १२.३० शाळा सुटणार आहे. दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्या वेळेत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. शाळापूर्व तयारीसाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सकाळी सात पूर्वी शाळेत हजर रहावे, असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.