शाळा केव्हा सुरु होणार ? पालकांमध्ये संभ्रमाची अवस्था
सार्वमत

शाळा केव्हा सुरु होणार ? पालकांमध्ये संभ्रमाची अवस्था

Arvind Arkhade

संगमनेर (वार्ताहर) - देशभरात करोना लॉकडाऊननंतर शाळा सुरू करणारे राज्य व केंद्र सरकारने भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. 1 जुलैपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने आदेश दिले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होतील किंवा कसे याबाबत संभ्रमाची अवस्था आहे. पालकांमध्ये प्रचंड भीती असून शिक्षकही धास्तावलेले आहेत.

24 मार्चला देशभरात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर शाळा महाविद्यालय पूर्णतः बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले होते त्यानुसार 1 जुलैला नववी ते बारावी शाळा सुरू करण्यासंदर्भात न्यूज देण्यात आले आहेत.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने उच्च प्राथमिक व प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचा अभ्यास घडू नयेत व शैक्षणिक प्रक्रियेत विद्यार्थी जोडलेला राहावा यासाठी ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आले आहेत. तथापि करोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची मानसिक स्थिती पालकांची नसल्याचे चित्र आहे.त्याच वेळेस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राज्यात सुरू नाही.

रेल्वेने प्रवास करण्यास शिक्षक, प्राध्यापकांना अनुमती नाही. त्यामुळे महानगरात शाळेला जाणे शिक्षकांना कठीण होणार आहे.अशा परिस्थितीत शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षक संघटना शासनाशी चर्चा करू पाहता आहेत. मात्र शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शाळा सुरू ठेवाव्या लागतील असा अंदाज आहे.

राज्यात शाळा सुरू करण्यासाठी परिस्थिती महानगरांमध्ये नाही. पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती आहे. अशा प्रसंगी शासनस्तरावरून दीक्षा प, आकाशवाणी, रेडिओ, घरपोच पाठ्यपुस्तके आधी पर्यायांचा विचार केला जात आहे. या पर्यायाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडून ठेवणे शक्य आहे. पालकही यास पसंती देत आहेत. शिक्षक यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सध्या नियमित वर्ग सुरू करण्याऐवजी ऑनलाइनचा पर्याय पूरक ठरत असल्याचे मत शिक्षण पालकांनी व्यक्त केले.

राज्यातील बहुता2ंश शाळा करोना संसर्गाच्या काळात संस्थात्मक कॉरंटाईन करण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत. त्या शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने त्यासंदर्भातील प्रमाणपत्र घेऊन शाळा सुरू करावे लागणार आहेत. तसेच शाळा पातळीवर सॅनिटायझर व्यवस्था, पुरेसा पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था त्यासाठीचे अंतर राखणे यासारखे विविध नियम पाळावे लागणार आहेत. त्यादृष्टीने तयारी करणे व त्यासाठीचा निधी उपलब्ध करणे याचे अडचणी असल्याचे समजते. ग्रामपंचायतीने खर्च कोठून करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचे सांगण्यात आले. शिक्षक संघटना शाळा सुरू करण्यासंदर्भात फारशा उत्सुक नसल्याचे चित्र आहे. प्राथमिक स्तरावरील शाळा कोणत्याही परिस्थितीत तात्काळ सुरू करता येणार नाहीत. माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा पट लक्षात घेता शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून शाळा चालविणे काहीसे कठीण आहे. त्या दृष्टीने शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघ यांनी देखील शासनाशी संवाद सुरू केला आहे. शाळा सुरू करताना येणार्‍या अडचणी व विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता सध्या शाळा सुरू करणार आहेत असे सांगण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com