पुन्हा एकदा... स्कूल चले हम!

कोविड नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत
पुन्हा एकदा... स्कूल चले हम!

अहमदनगर (प्रतिनिधी)

करोनाच्या (corona) पहिल्या लाटेपासून बंद असणाऱ्या शाळांचे दरवाजे आजपासून उघडले.

कोविडचा (COVID19) प्रभाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाने शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग भरविण्यास मुभा दिली. त्यानुसार शहरातील अनेक शाळांमध्ये आज कोविड नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. (school reopen in ahmednagar)

पुन्हा एकदा... स्कूल चले हम!
Cruise Drug Bust क्रूजवर पुन्हा छापा, आणखी ड्रग्ज जप्त, सहा जण ताब्यात

शाळांमध्ये करोनाचे सर्व नियमांचे काटेकारे पालन करण्यात येणार आले. मास्क, सॅनिटायझर, विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे आदी उपाययोजनांसह अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. पहिले दोन आठवडे अध्यापन न करता विद्यार्थ्यांना शाळेसाठी मानसिकपणे तयार करण्याच्या सूचना आहेत. अनेक शाळांनी पालकांचे संमती व हमीपत्र लिहून घेतले आहे.

आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, शोलय पोषण विभागाचे अधिक्षक, केंद्रप्रमुख, सर्व साधन व्यक्ती (विशेष शिक्षक, विशेष तज्ज्ञ, विषय साधन व्यक्ती), तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह अन्य शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्या अधिनस्त पर्यवेक्षीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही शाळा भेटी करून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये शाळा सुरळीत व उत्साहवर्धक वातावरणात सुरू राहतील यासाठी पूरक वातावरण निर्मिती करण्याचे आवाहन केले.

९६ पैकी किती?

जिल्ह्यात सध्या २२५ आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होत्या. त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. नगर शहरात ८ ते १२ पर्यंत वर्गाच्या ९६ शाळा नियमित होतील, असा शिक्षण विभागाचा अंदाज आहे. या ९६ पैकी किती शाळांनी नियमित वर्ग केले आणि पहिल्या दिवशी किती विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, या माहितीचे संकलन करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com