पहिली ते आठवीपर्यंतचे 50 टक्के विद्यार्थी शाळेत

3 हजार 502 शाळा भरल्या
पहिली ते आठवीपर्यंतचे 50 टक्के विद्यार्थी शाळेत
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविडचा प्रादूर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार करोना नियमांचे पालन करत गुरूवारपासून पहिली ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यात पहिल्यादिवशी मंजूर पटसंख्येपैकी निम्मे विद्यार्थी दाखल झाले होते. यात सुमारे दोन वर्षांनंतर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळेत हजर झाले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील माहितीनुसार जिल्ह्यात सर्व व्यवस्थापन आणि माध्यमाच्या 3 हजार 552 शाळा आहेत. गुरूवारी यापैकी 3 हजार 502 शाळा भरल्या होत्या. करोना नियमांचे पालन करत पालकांकडून संमतीपत्रे भरून घेत या शाळा सुरू करण्यात आल्या. या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 2 लाख 18 हजार 875 असून काल पहिल्याच दिवशी 1 लाख 18 हजार 217 विद्यार्थी शाळेत हजर झाले होते.

म्हणजे जवळपास 50 टक्के विद्यार्थी शाळेत आले होते. कोविड नियमांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत बोलविणे, एका आड त्यांची बसण्याची व्यवस्था करणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com