वर्षभरापासून रखडलेले शालेय पोषण आहाराचे मानधन द्यावे

File photo
File photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शालेय पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी व मदतनिस यांचे वर्षभरापासून थकलेले मानधन तातडीने देण्यात यावे, अशी मागणी स्वयंपाकी व मदतनिस यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शालेय पोषण आहार शिजवणारे स्वयंपाकी व मदतनिस यांचे सुमारे वर्षभरापासून मानधन थकलेले आहे.

वर्षभरापासून मानधन न मिळाल्याने आम्हा सर्वांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होवून बसले आहे. आम्ही सर्वजण हातावर पोट भरणारी माणसे असून दुकानदार आता आम्हाला उधारीवर किराणा देण्यास विरोध करीत असून आमच्या कुटुंबाची मोठी कुचंबना होत आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आमचे वर्षभराचे थकीत मानधन येत्या पंधरा दिवसात आमच्या खात्यावर जमा करण्यात यावे.

तसेच इंधन बिल देखील मिळालेले नाही. तरी सदरचे बील त्वरीत मिळण्याकरिता कार्यवाही व्हावी, अन्यथा नाईलाजास्तव आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी वळदगाव येथील शबाना शेख, मेहमुद शेख, कान्हेगाव येथील अशोक रामभाऊ खरात, विजया गिरमे, निलेश लांडे, भाऊसाहेब गिरमे यांच्यासह स्वयंपाकी व मदतनिस उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com