श्रीरामपूरातील प्राथमिक शाळेतून शालेय पोषण आहारातील तांदुळामध्ये प्लास्टीक सदृश तांदूळ

तांदूळाचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत
श्रीरामपूरातील प्राथमिक शाळेतून शालेय पोषण आहारातील तांदुळामध्ये प्लास्टीक सदृश तांदूळ
file Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) सूतगिरणी प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापोटी (School nutrition diet) तांदूळ (Rise) वाटण्यात आले होते. मात्र काही महिला पालकांना यामध्ये काही प्रमाणात प्लास्टीक सदृश तांदूळ आढळून आल्याने त्यांनी थेट गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे (Group Education Officer Sanjeevan Dive) यांचेकडे तक्रार केली. त्याची दखल घेत त्यांनी त्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले आहेत.

यापूर्वी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून दिला जात होता. मात्र सध्या शाळा बंद असल्याने त्यांना थेट तांदूळ वितरित केला जात आहे. सध्या शाळांना शासनाकडून डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीतील तांदूळ प्राप्त झाला आहे. त्याचे वाटपही झाले आहे. सूतगिरणी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शासकीय नियोजनाप्रमाणे (Government planning) विद्यार्थ्यांना तांदूळ दिला. शिजवण्यासाठी माता पालकांनी तो घेतला असता त्यांना त्यामध्ये काही प्रमाणात प्लाष्टीक सदृश्य तांदूळ (Plastic resembling rice) असल्याचे लक्षात आले.

यावर त्यांनी थेट पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांचेकडे तक्रार केली. त्यांची दखल घेत दिवे यांनी तांदळाचे नमुने ताब्यात घेतले. यामध्ये खरंच प्लास्टीक सदृश्य अंश आहे का ? याची तपासणी करण्यासाठी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे (District Public Health Laboratories) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांचेकडे पाठवला आहे. त्याचा अहवाल (Report) काय येतो याकडे आता पालकांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.