यंदा शालेय पोषण आहाराचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

खाते उघडण्यासाठी शिक्षकांचे पालकांना आवाहन
यंदा शालेय पोषण आहाराचे पैसे थेट
विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भारत सरकारच्या निर्देशानुसार 2021-2022 च्या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुटीसाठी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप थेट न करता विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे. यामुळे या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडण्यात यावे. बँक खाते आधार लिंक आहेत किंवा नाहीत, लिंक नसल्यास आधार लिंक करावेत, तसेच विद्यार्थ्यांची बँक खाते उघडली नसल्यास त्यांचे आधार लिंक खाते उघडण्याचे आदेश शाळांना शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

त्यानुसार अनेक शाळांनी याची अंमलबजावणी सुरू केली असून वर्गशक्षक आपापल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून खाते उघडण्याचे आवाहन करीत आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे देशात सरकारी आणि अनुदानित शाळांमधील 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, जिल्हा परिषद हायस्कूल, अनुदानित, अंशतः अनुदानित सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक बँक खाते उघडण्याबाबत शाळांनी हालचाली कराव्यात तसेच बँक खाते उघडण्याकरिता पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले आहेत.

शिक्षक-पालकांची भीती

ऐन लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे शासन करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहे. मात्र या काळात विद्यार्थ्यांची बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने बँकांमध्ये गर्दी होऊन करोना संसर्ग वाढण्याची भीती पालकवर्गांकडून व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com