पोषण आहाराचे पैसे म्हणजे चार आण्याची कोंडबी अन् बारा आण्याचा मसाला

200 रुपयांसाठी आधी 500 रुपयांचे बँकेत खाते खोलावे लागणार
पोषण आहाराचे पैसे म्हणजे चार आण्याची कोंडबी अन् बारा आण्याचा मसाला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उन्हाळी सुट्टीतील पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराचे पैसे (School nutrition diet Money) त्यांच्या बँक खात्यात जमा (Bank Account) करण्याचा प्रक्रियेचा मनस्ताप शिक्षक (teacher) आणि संबंधीत विद्यार्थ्यांचा पालकांना (parents) सहन करावा लागणार आहे. यात विद्यार्थ्यांचे बँकेत खाते (Student Bank Account) नसल्यास त्यांना आधी 500 रुपये भरून नव्याने खाते उघडावे लागणार आहे. तसेच जुने खाते असल्यास ते आधार कार्डशी लिंक (Link to Aadhar Card) करावे लागणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत सरकार 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 134 रुपये तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 200 रुपये पोषण आहारापोटी (Nutritious diet) त्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहेत. यामुळे हे पैसे संबंधीत विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला ठरणार आहेत.

केंद्राच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत (Central National Food Security Campaigns) देशातील जनतेला मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. या मोफत धान्य वाटप मोहिमेचा (Free grain distribution campaign) भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेतंर्गत 2021 च्या उन्हाळ्याच्या सुटीतील 1 मे ते 15 जुन या कालावधीतील पोषण आहाराची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आदेश प्राथमिक शिक्षण संचालयानाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यानूसार थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहेत. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याची माहिती शिक्षकांना जमा करून त्याची यादी करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांचे बँक खाते (Student Bank account) नसल्यास त्यासाठी नव्याने बँक खाते उघडावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी पालकांना किमान 500 रुपये खर्च करावे लागणार आहे. यासह संबंधीत विद्यार्थ्याचा आधार नंबर त्या खात्याला लिंक करावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 8 जुलैपर्यंत वेळ शिक्षकांना दिलेला आहे. यामुळे दीडशे ते दोन रुपयांसाठी आधी विद्यार्थी आणि पालकांना किमान 500 रुपये खर्च करावा लागणार आहे. या वेळखाऊ प्रक्रियेत शिक्षकांचे अध्यापन बाजूला पडणार आहे.

ही आहेत आव्हाने

पहिली आणि दुसर्‍या विद्यार्थ्यांचे नव्याने खाते उघडावे लागणार आहे. यापूर्वी या विद्यार्थ्यांची राष्ट्रीयकृत आणि आयएफसी कोड असणारे बँकेत खाते उघडण्यात आलेली नाहीत. ही खाते उघडतांना पहिली समस्याही पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची येणार आहे. या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झालेली नसल्याने आधी ते अपडेट करावे लागणार आहे. दुसरीकडे आदिवासी भागात पालकांचे आधार कार्ड नसल्याने विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड कसे उपलब्ध करणार हा प्रश्‍न राहणार आहे.

पालक-विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते उघडावे लागणार

या योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेत एकट्या विद्यार्थ्याच्या खात्याऐवजी पालक आणि विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते उघडावे लागणार आहे. एकटा विद्यार्थी संबंधीत खाते ऑपरेट करू शकणार नाही. यासाठी बँकेत खाते उघडतांना पालकांची आधार, फोटोसह अन्य कागदपत्र मिळविण्यासाठी शिक्षकांची धावधाव होणार आहे. तसेच वेळप्रसंगी विद्यार्थ्यांच्या खात्यासाठी अनेक ठिकाणी शिक्षकांना पदरमोड करण्याची वेळ येवू शकते.

लाभ न मिळाल्यास शिक्षकच जबाबदार

प्राथमिक शिक्षण संचालयाच्या आदेशात या योजनेचा लाभ देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती संकलित करून ती आधी तालुकास्तरावर आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर सादर करण्याचे आदेशीत आहे. यात त्रुटी राहून पात्र विद्यार्थ्याला लाभ न मिळाल्यास संबंधीत शिक्षकांवर त्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षकांना बँक खाते उघडण्यासाठी आधी विद्यार्थी आणि त्यानंतर पालकांच्या मागे पळावे लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com