शाळेच्या मैदानावर गांजा ओढणारे अटकेत

कोतवाली पोलिसांची सारसनगर भागात कारवाई
शाळेच्या मैदानावर गांजा ओढणारे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शाळेच्या मैदानात गांजा पिणार्‍या तिघांवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे. आशिष विजय शिंदे (वय 20 रा. बुरूडगाव रोड, नगर), विशाल राजेंद्र भंडारी (वय 21 रा. वाकोडीरोड, नगर) व नवाज रौफ सय्यद (वय 21 रा. बुरूडगाव रोड, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली.

शाळेच्या मैदानावर गांजा ओढणारे अटकेत
राज्य नाट्य स्पर्धा 2022 : राणी-मुंग्याचं ‘वारूळ’

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, अंमलदार गणेश धोत्रे, भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, अमोल गाढे, सुजय हिवाळे, शरद वाघ, सोमनाथ राऊत, संदीप थोरात यांचे पथक सारसनगर भागात गस्त घालत होते.

शाळेच्या मैदानावर गांजा ओढणारे अटकेत
बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा ठार

त्यांना माहिती मिळाली की, भोसले आखाडा येथील शाळा क्रं. 17 च्या मैदानावर काही इसम आमली पदार्थाचे सेवन करत आहेत. पथकाने तत्काळ पंचासमक्ष शाळेचे मैदान गाठले. तेथे तिघे जण मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

शाळेच्या मैदानावर गांजा ओढणारे अटकेत
जिल्ह्यात भूकंपाची नोंद नाही

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com