शाळकरी मुलीला पळविले

शाळकरी मुलीला पळविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एका 14 वर्षीय शाळकरी मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. नगर-सोलापूर महामार्गावर असलेल्या एका गावात राहणार्‍या व्यक्तीने याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्या व्यक्तीच्या 14 वर्षीय शाळकरी मुलीला नगर तालुक्यातील मठपिंप्री गावात राहणार्‍या युवकाने फूस लावून पळवून नेल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात युवकाविरूध्द भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com