शालेय खाद्य तेल व मसाले वाटपाविना विद्यालयांत पडून
सार्वमत

शालेय खाद्य तेल व मसाले वाटपाविना विद्यालयांत पडून

गोडेतेल खराब होण्याचा धोका

Arvind Arkhade

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोनामुळे मार्च महिन्यापासून कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बंद आहे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारा पोषण आहार एप्रिल महिन्यात कोरड्या शिधा रूपात विद्यार्थ्यांना वाटप केला. त्याबरोबर असणारे खाद्य तेल व मसाले वाटपविना विद्यालयांत पडून असल्याने हजारो किलो गोडेतेल खराब होण्याचा धोका निर्माण झालाआहे.

गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कोपरगाव यांनी 17 ऑगस्ट रोजी पोषण आहार पात्र शाळांना माहे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील शालेय पोषण आहार वाटप करण्याच्या दिलेल्या आदेशा नुसार शालेय व्यवस्थापन समितीने गरजू विद्यार्थ्यांची निवड करून शिल्लक असलेला कोरडा शिधा वाटप करावा असे आदेशात नमूद केले.

पॅकिंग खाद्य तेलाची मुदत उत्पादन तारखेपासून जास्तीत जास्त केवळ सहा महिने असते. मार्च महिन्याच्या अगोदरचे नियतनाने सहा महिन्यांचा कालावधी केव्हाच पार केलेला आहे. मुदतबाह्य खाद्य तेल अथवा पॅकिंग माल विद्यार्थ्यांना वाटप करू नये असेही आदेशात नमूद आहे.

एप्रिल महिन्यात कोरडा शिधा विद्यार्थी व पालकांना वाटप करण्यात आला त्याबरोबर खाद्य तेल वाटप केले असते तर खाद्य तेल खराब होण्याचा धोका निर्माण झाला नसता. शिक्षण विभाग खाद्य तेल खराब होण्याची वाट बघत होते का? असा प्रश्न सामाजिक संस्था उपस्थित करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com