शाळा बंद, बार चालू!

विखेंची टिका : सरकारची दिशा कोणती?
शाळा बंद, बार चालू!
आ. राधाकृष्ण विखे पाटील

राहाता | प्रतिनिधी

कोविड संदर्भात सरकारचे निर्बंध म्हणजे 'शाळा बंद, बार चालू' असेच असल्याने सरकारची नेमकी दिशा कोणती असा सवाल आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील इतर जनतेचाही विचार करावा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

कोविड उपचारानंतर आ. विखे पाटील यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

सरकारने लादलेल्या ताज्या निर्बंधांवर त्यांनी टिका केली. कोविड संकटात निर्णय घेताना महाविकास आघाडीत स्वतःची कोणतीची निर्णय क्षमता दिसून आली नाही. यापूर्वीही सरकारने मंदिर बंद ठेवून मदिरालयं सुरु ठेवली होती, आत्ताही सरकारच्या निर्बंधांमध्ये तीच परिस्थिती आहे.

१५ फेब्रुवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र दुसरीकडे परमिट रुम सुरु ठेवण्यावर सरकारचे कोणतेही बंधनं नाहीत यावरुनच या सरकारची दिशा कोणती आहे हे समजते. महाविद्यालये बंद करुन, सरकारने आता विद्यार्थी, पालकांच्या जीवनाशी खेळ करू नये सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोधच आहे. त्यामुळे टास्कफोर्सने सुचविलेल्या सुचनांचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली.

Related Stories

No stories found.