वर्गात आढळली आंतरवस्त्रे व कंडोम पाकिटे

वर्गात आढळली आंतरवस्त्रे व कंडोम पाकिटे

पालकांमध्ये खळबळ; राहुरी तालुक्यातील प्रकार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) एका नामांकित शिक्षण संस्थेच्या (Educational Institution) राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील माध्यमिक विद्यालयात बंद असलेल्या वर्गात विद्यार्थीनींची आंतरवस्त्रे व कंडोमची पाकिटे (Condom Wallets) आढळून आल्याने पालकांना धक्का बसला आहे.

वर्गात आढळली आंतरवस्त्रे व कंडोम पाकिटे
राहुरीत दरोडेखोरांची टोळी जेरबंद

दरम्यान, या बंद असलेल्या वर्गाचे कुलूप (Class Room Lock) तोडून वर्गात काही अनैतिक प्रकार घडतो की काय? अशी चर्चा सुरू आहे. शुक्रवार दि. 3 जून रोजी काही पालक आपल्या पाल्यांना मिळणार्या मोफत धान्य आणण्यासाठी गेले होते. त्यातील काही पालकांना शाळेच्या एका वर्गाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. पालकांनी आत डोकावून बघितले असता आतमध्ये मुलींचे आंतरवस्त्र व कंडोमची पाकिटे आढळून आली.

वर्गात आढळली आंतरवस्त्रे व कंडोम पाकिटे
पुणतांबा आंदोलक शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी मंत्रालयात 7 जूनला बैठक

यावेळी शांतीचौक मित्रमंडळाचे दीपक त्रिभुवन यांनी आपल्या सहकार्यांसमवेत वर्गात जाऊन पाहणी केली. त्यांनी तातडीने मुख्याध्यापकांना बोलावून त्यांच्याही निदर्शनास त्या वस्तू आणून दिल्या. यावर मुख्याध्यापकांनी हा वर्ग बर्याच दिवसांपासून बंदच होता. असे सांगून या वर्गाचे दार तातडीने बंद करणार असल्याचे सांगितले. तर शाळेच्या वर्गाकडे आणि स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केल्याची कबुली दिली. याबाबत संबंधित शिक्षण मंडळांच्या पदाधिकार्यांनाही ही घटना सांगण्यात आली आहे.

वर्गात आढळली आंतरवस्त्रे व कंडोम पाकिटे
उसाच्या शेतात आढळला मृत बिबट्या

शालेय वर्गात या आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याने संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून या घटनेला पायबंद घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com