नेवासा बुद्रूकची शाळा इमारत लोकसहभागातून बांधणार

ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय
नेवासा बुद्रूकची शाळा इमारत लोकसहभागातून बांधणार

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

नवीन शाळा इमारत लोकसहभागातून बांधण्याचा निर्णय नेवासा बुद्रुक ग्रामस्थांनी घेतला आहे. सरपंच प्रज्ञाताई सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीच्या झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडही करण्यात आली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्राम पंचायत सदस्य पोटनिवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सुनिताताई बबनराव सोनटक्के यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अर्चना विशाल जायगुडे, तर उपाध्यक्षपदी सुधाकर कोकणे यांची निवड करण्यात आली. सरपंच तसेच प्रकाश सोनटक्के यांनी त्यांचा सन्मान केला.

यावेळी करोनच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती, ऑनलाइन शिक्षण, शंभर टक्के विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढणे, शालेय इमारत निर्लेखन आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अर्चना जायगुडे व सदस्य श्रीरमेश यादव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश सोनटक्के यांनी नवीन शाळा खोल्या लोकसहभागातून बांधण्याची इच्छा व्यक्त करून सर्व उपस्थित व ग्रामस्थ यांना लोकसहभागकरिता आवाहन केले. त्यास उपस्थीत मान्यवरांनी दुजोरा दिला.

प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी घुले यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी सातपुते यांनी केले तर हर्षला ताके यांनी आभार मानले.

कार्यक्रमास उपसरपंच सुधाकर मोहन कोकणे, रमेश फुलकर, रमेश लोखंडे, सचिन धोंगडे तसेच बबन सोनटक्के शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आशा राजेंद्र मारकळी, रमेश लक्ष्मण यादव, सुनीता राजू पवार, वैशाली सचिन चांदणे, परविन सादिक इनामदार, मधुकर शांतीलाल डौले व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com