वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

नेवासा | तालुका प्रतिनिधी

शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना नेवासा तालुक्यातील म्हसले येथे शुक्रवार (दि.२८) रोजी दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास घडली. साई उर्फ बहीरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय १० वर्षे ) असे मयत मुलाचे नाव आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
Crime News : क्षुल्लक कारणावरुन वाद, दगडाने वार करून निर्घृणपणे संपवलं

आज शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी ११:३० ते १२:१५ यावेळेत नेवासा तालुक्यात वीजच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पाऊस सुरु होण्याचे दरम्यान सकाळी १२:१५ वाजेच्या दरम्यान घराच्या सोबत शेतातील कांदा झाकण्यासाठी गेलेल्या साई उर्फ बहीरुनाथ राजेंद्र शिरसाठ (वय १० वर्षे ) या इयत्ता ४ थी मध्ये असलेल्या शालेय विद्यार्थ्याचे अंगावर कडकडणारी वीज पडली, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.

वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
मुळाकाठ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

त्याचा मृत्युदेह नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे. या दुर्देवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरूच! वीज कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
नगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्.... पाहा VIDEO
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com