
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोनामुळे (Covid 19) अनेक वेळा पुढे ढकललेली शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) अखेर गुरूवार (दि.12) होणार असून जिल्हा परीषदेच्या (Zilla Parishad) शिक्षण विभागाने (Education Department) या परीक्षेची सर्व तयारी केली आहे. नगर जिल्ह्यातून (Ahmednagar District) या परीक्षेसाठी (Exam) 47 हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. जिल्ह्यात 368 केंद्रांवर ही परीक्षा करोनाचे नियम (rules of the corona) पाळून होणार आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ( Maharashtra State Examination Council) शालेय स्तरावर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Secondary Scholarship Examination) (इ.8वी) आयोजित केली जाते. यंदा 23 मे रोजी ही परीक्षा होणार होती. त्यासाठी जिल्ह्यात (District) 368 केंद्रांची निश्चिती करून परीक्षेची तयारीही झाली होती, परंतु करोनामुळे शासनाने ही परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी ही परीक्षा जाहीर (Exam announced) झाली. परंतु तीही रद्द करत अखेर 12 ऑगस्ट परीक्षा होत आहे. दरम्यान, या शिष्यवृत्तीसाठी नगर जिल्ह्यातून 2019 शाळांच्या 47 हजार 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यात 30 हजार 85 पाचवीचे विद्यार्थी, तर 16 हजार 959 आठवीचे विद्यार्थी आहेत.
नियोजनासाठी 3 हजार 381 कर्मचारी
या परीक्षेच्या नियोजनासाठी 368 केंद्र संचालक, 5 उपकेंद्र संचालक, 2370 पर्यवेक्षक, 638 परिचर असे एकूण 3 हजार 381 मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
असे असेल वेळापत्रक
प्रथम भाषा व गणित या विषयाचा पेपर सकाळी 11 ते 12.30, तर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी दुपारी दीड ते 3 या वेळेत होणार आहे.
परीक्षेवर करोनाचे सावट
जिल्ह्यातील करोनाचा वाढता संसर्ग हा जिल्हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. नगर जिल्हा राज्यात करोना संसर्गात अव्वल असून अशा परिस्थितीत शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येणार असून यामुळे परीक्षेवर करोनाचे सावट आहे.