गैरहजर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा शुल्क शिक्षकांकडून वसूल करणार

शिष्यवृत्तीच्या परीक्षेला 1 हजार 67 विद्यार्थ्यांची दांडी
गैरहजर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा शुल्क शिक्षकांकडून वसूल करणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिष्यवृत्तीचा परीक्षेचा निकाल वाढला असला तरी या परीक्षेला 1 हजार 67 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. परीक्षेला दांडी मारणार्‍या विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क यांच्या शिक्षकांकडून वसूल करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

दरवर्षी परीक्षा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्तीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. भाषा, गणित आणि इंग्रजीचे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढावे यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. तर नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी याठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसवण्यात येते. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून या विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क भरण्यात येतो. या परीक्षेसाठी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 200 रुपये शुल्क आहे. तर मागासवर्गी आणि द्विव्यांग विद्यार्थ्यांसाठी 125 परीक्षा शुल्क आहे. हा शुल्क गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद प्रशासन भरत आहे.

यंदा पाचवीसाठी 15 हजार 881 विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क भरण्यात आला होता. शुल्काची रक्कम 27 लाख 25 हजार 425 होती. मात्र, यातील 895 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. तर आठवीसाठी 1 हजार 670 विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क भरला होता. शुल्काची रक्कम 2 लाख 74 हजार 250 रुपये होती. यातील 172 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेला गैरहजर राहिल्याने 1 हजार 67 विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क वाया गेला आहे.

याला संबंधीत शाळेतील वर्ग शिक्षक यांना जबाबदार धरण्यात येणार असून आता गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षा शुल्क संबंधीत शिक्षकांकडून वसूल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यासह या परीक्षेसाठी वर्षभर विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यात येते. यात सराव परीक्षा, अतिरिक्त तासिकांचा समावेश आहे. यात संबंधीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा श्रम देखील विद्यार्थी गैरहजर राहिल्याने वाया जात आहे. भविष्यात शिक्षकांनी जबाबदारी विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या परीक्षेला गैरहजर राहणार नाही, यासाठी शिक्षण विभाग एका प्रकारे संबंधीत शिक्षकांवर परीक्षा शुल्क भरून घेत कारवाई करत असल्याचे सांगण्यात आले.

तालुकानिहाय गैरहजर

अकोले 115, संगमनेर 75, कोपरगाव 47, जामखेड 71, पाथर्डी 65, शेवगाव 48, कर्जत 28, पारनेर 89, नेवासा 111, श्रीरामपूर 50, राहाता 89, राहुरी 144, श्रीगोंदा 48 आणि नगर 88 अशा प्रकारे 1 हजार 67 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com