शिष्यवृत्ती परीक्षा फीमध्ये वाढ
File Photo

शिष्यवृत्ती परीक्षा फीमध्ये वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमीक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे या कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शुल्कात वाढ करण्यात आली.

अशी असेल फीवाढ

- प्रवेश शुल्क : बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी

20 रुपयांऐवजी 50 रुपये

- प्रवेश शुल्क : मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी

20 रुपयांऐवजी 50 रुपये

- प्रवेश शुल्क : बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी

60 रुपयांऐवजी 150 रुपये

- प्रवेश शुल्क : मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 00 रुपयांऐवजी 75 रुपये

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com