शिष्यवृत्ती परीक्षेत नेवासा तालुक्यातील 383 विद्यार्थी ठरले पात्र

पहिल्या तीन क्रमांकाचे विद्यार्थी सौंदाळा शाळेचे; आठवी शिष्यवृत्तीत चौघे पात्र
शिष्यवृत्ती परीक्षेत नेवासा तालुक्यातील 383 विद्यार्थी ठरले पात्र

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 चा ऑनलाईन अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले असून 383 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

यावर्षी नेवासा तालुक्यातील इयत्ता पाचवीसाठी एकूण 68 जिल्हा परिषदेत शाळेतील 1621 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1522 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि त्यापैकी 383 विद्यार्थी या परीक्षेतून पात्र झाले आहेत. तसेच इयत्ता आठवी साठी सहा जिल्हा परिषद शाळेतून 112 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले. यापैकी 4 विद्यार्थी पात्र झाले आहेत. इयत्ता पाचवी मध्ये 220 पेक्षा जास्त गुण मिळवणारी विद्यार्थी संख्या तालुक्यातून 34 इतकी आहे.

इयत्ता पाचवी मध्ये 220 पेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या 34 विद्यार्थ्यांमध्ये एकट्या सौंदाळा शाळेचे 28 विद्यार्थी पात्र असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकाच शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी पात्र होण्यामध्ये ही शाळा जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.

याचबरोबर 220 पेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या शाळांमध्ये आणखी अंमळनेर (1), निंभारी (4), मोरयाचिंचोरे (1), वडाळा बहीरोबा (2), नांदूर शिकारी (3), पाथरवाला (1), फुलारी वस्ती (3), गिडेगाव (1), आणि गोपाळपूर (3) असे एकूण 34 विद्यार्थी आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना लतिका कोलते, रवींद्र शिंदे, रवींद्र तुपे, चंद्रकांत देवढे, सुवर्णा भालसिंग, सुभाष पवार, सुरेश पालवे, आदिनाथ गिरी, श्री. उबाळे, तुकाराम वाघुले यांचे मार्गदर्शन लाभले.

नेवासा तालुक्यात सिद्धी गवांदे (286 गुण) प्रथम, आदित्य पागीरे (282 गुण) द्वितीय तर वेदांत ठाणगे (280 गुण) याने तृतीय क्रमांक मिळविला असून तिघेही सौंदाळा शाळेतील आहेत.त्यांना वर्गशिक्षक म्हणून आदर्श शिक्षक रवींद्र पागिरे यांचे मार्गदर्शन लाभले.

करोना लॉकडाऊन असल्यामुळे निम्मेच शैक्षणिक वर्षात शाळा नियमित सुरू होत्या, तरीही तालुक्याच्या निकालात वाढ झाली आहे.

दरम्यान गेल्या वर्षी घेतल्या गेलेल्या 11 सराव परीक्षा, शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग यामुळे निकाल वाढला.असल्याचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी सांगितले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे नेवासा तालुका शिक्षण विभागाचे गटविकास अधिकारी संजय दिघे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com