विखुरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

कुठे घडली घटना?
विखुरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील चास शिवारातील एका मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात जवळच महिलेचे कपडे, मंगळसूत्र आढळून आल्याने हा मृतदेह महिलेचा असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाचे तुकडे इतरत्र विखुरलेले असल्याने व काही प्राण्यांनी या मृतदेहाचे लचके तोडलेले असल्याने अनेक दिवसांपासून हा मृतदेह त्या जागेत पडलेला असण्याची शक्यता आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

चास शिवारात महामार्गापासून सुमारे तीन किलोमीटर आतील डोंगराळ भागात साहेबराव लक्ष्मण गावखरे यांच्या शेतात सुमारे 25 ते 30 गुंठे जागेत मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती तेथील पोलीस पाटील रमेश मुरलीधर रासकर यांनी शनिवारी सकाळी पोलिसांना दिली. माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, संदीप ढाकणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

नगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर मृतदेह 25 ते 30 गुंठे मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच जवळच महिलेचे कपडे, केस, मंगळसूत्र, डोक्याची कवटी पोलिसांना आढळून आली. सुमारे 30 ते 35 वर्षे वयाचा हा मृतदेह असावा. मृतदेहाच्या तुकड्यांचे प्राण्यांनी लचके तोडलेले असल्याने अनेक दिवसांपासून हा मृतदेह त्या जागी पडलेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com