घोटाळेबाजांच्या टीईटीच्या यादीत नगरच्या नावांची आज पडताळणी

घोटाळेबाजांच्या टीईटीच्या यादीत नगरच्या नावांची आज पडताळणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात टीईटी परीक्षेत घोळ घालून पास झालेल्या त्या 7 हजार 800 शिक्षकांची यादी अखेरसमोर आली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील 29 खासगी प्राथमिक शिक्षकांचे टीईटीचे प्रमाणपत्र जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते. तर पुण्यावरून आलेल्या बोगस टीईटीधारकांच्या यादीत प्राथमिककडील 29 शिक्षकांची नावे आहेत का, याची तपासणी शिक्षण विभाग आज (दि.12) करणार आहे.

2018-2019 या कालावधीत टीईटी परीक्षा घोटाळा झाला होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर पुणे सायबर क्राईमकडून त्याचा तपास सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यातील माध्यमिकचे 30 आणि खासगी शाळांमधील 29 शिक्षकांचे 59 टीईटी पात्र विद्यार्थी आहेत. या 59 शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी पुण्याला पाठविलेले आहेत. यात माध्यमिककडील शिक्षकांचे प्रमाणपत्र हे ओके असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता प्राथमिककडील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचा विषय आहे.

पुण्यावरून घोळ घातलेल्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. त्या यादीत नगर जिल्ह्यातील शिक्षकांची नावे आहेत का? याची पडताळणी शिक्षण विभाग आज करणार आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनूसार खासगी प्राथमिककडील शिक्षकांची जी प्रमाणपत्र पुण्याला पाठवलेली आहेत. त्यातील बहुतांशी प्रमाणपत्र हे 2013 मधील आहे. त्यानंतर 2020 पर्यंतच्या टीईटी प्रमाणपत्रांची संख्या ही नगण्य आहे.

दुसरीकडे परीक्षा परिषदेने संबंधित घोटाळ्यातील परीक्षार्थींच्या संपादणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच यापुढे टीईटी परीक्षेसाठी कायम स्वरूपी प्रतिबंधही घालण्याचा निर्णय घेतला असून यामुळे भविष्यात अशा प्रकारांना आळा बसले, असे शिक्षणविभागाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com