६८ लाखांचा घोटाळा; आरोपीला अटक

६८ लाखांचा घोटाळा; आरोपीला अटक
श्रीगोंदा जमीन घोटाळा

अहमदनगर (प्रतिनिधी)

येथील महाराष्ट्र बँकेतील ६८ लाख रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणातील पसार आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुपा (ता. पारनेर) येथून अटक केली. महेश भाऊसाहेब बांगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी बांगर पसार झाला होता. पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती.

गुरूवारी तो सुपा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. पोलीस उपअधीक्षक प्राजंल सोनवणे, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कुसमुडे, पोलीस नाईक मंगेश खरमाळे, पोलीस हवालदार साळवे यांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com