अनुसूचित जाती, नवबौध्दांच्या विकासासाठी 80 कोटी

जिल्हा वार्षिक योजनेंतंर्गत निधी मंजूर झाल्याची सभापती परहर यांची माहिती
अनुसूचित जाती, नवबौध्दांच्या विकासासाठी 80 कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाच्या (State Government) सामाजिक न्याय (Social justice) व विशेष सहाय्य विभागांतर्गत नगर जिल्हा परिषद (Nagar Zilla Parishad) समाज कल्याण विभागाला (Department of Social Welfare) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींच्या विकासासाठी 80 कोटींचा निधी मंजूर (Approved) झाला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हा निधी मंजूर (Approved) झालेला असून या निधीतून संबंधित वस्त्यांमध्ये पाणी पुरवठ्याची कामे (Water supply works), मलनिसारण, गटार बांधणे, रस्ते, पोहोच रस्ते, पर्जन्य पाण्याचा निचरा, वीज पुरवठा (Power supply), समाज मंदिर आदी कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत, अशी माहिती समाजकल्याण समिती सभापती उमेश परहर (Social Welfare Committee Chairman Umesh Parhar) यांनी दिली.

शासन निर्णय 5 डिसेंबर 2011 नुसार लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात मंजूर आराखड्यानुसार 2 ते 20 लाखांपर्यंतचे अनुदान मंजूर (Approved) करण्यात येते. 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला (Zilla Parishad) 80 कोटी इतका नियतव्यय मंजूर असून त्यापैकी 30 टक्के 24 कोटींचा निधी बिम्स प्रणालीवर (Beams system)उपलब्ध झालेला आहे.

उर्वरित 56 कोटींचा निधीही लवकरच प्राप्त होणार आहे. यापार्श्वभूमीवर समाज कल्याण समितीच्या बैठकीत निधी विनियोगाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती परहर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे (District Social Welfare Officer Radhakisan Devdhe)आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकार्‍यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी या योजेनेंतर्गत वस्तीतील नागरिकांच्या मागणीनुसार परिपूर्ण प्रस्ताव 31 ऑगस्टपर्यंत समाजकल्याण विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकही वस्त् लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन सभापती परहर यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com