संवत्सर परिसरात विजेच्या तारा चोरून नेणार्‍यास मुद्देमालासह अटक

संवत्सर परिसरात विजेच्या तारा चोरून नेणार्‍यास मुद्देमालासह अटक

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरातील गणपती तळ्याजवळील विजेच्या खांबावरील विद्युत वाहक तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या चौकशीत एक मोटारसायकल व 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीच्या मुसक्या आवळ्याची घटना घडली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत संवत्सर शिवारातील गणपती तळ्याचे परिसरात अज्ञात चोरट्याने विजेच्या पोलवरील विद्युत वाहक तारा चोरून नेलेबाबत शहर पोस्टेस गुर.नं. 221/2021 भा.दं. वि. कलम 136 प्रमाणे दाखल झाला होता.

पो.ना. ए. एम. दारकुंडे, पो.कॉ. गणेश मैड , पो.कॉ. बी.बी. धोंगडे पेट्रोलींग करत असताना संशयावरून अशोक उर्फ मुकेश उत्तम बोर्डे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. साथीदारांबाबत विचारपुस केली असता त्याने त्यास गुन्हा करताना भारत मच्छिंद्र वन्से रा. लोणी, ता. वैजापूर, शिवा निवृत्ती गायकवाड रा. हिलालपूर, ता. वैजापूर असे साथीदार असल्याचे सांगितले. यातील शिवा गायकवाड यास पोलिसांनी त्याच्या राहते घरून ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करत 35 हजार रुपये किमतीची 720 मीटर लांबी असलेली व 34 स्क्वेअर जाडीची अल्युमिनीअमची वीज वाहक तार जप्त करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com