सावळीविहीर आरोग्य केंद्र झाले कोविड सेंटरमय

ऑक्सिजन यंत्रणेची जय्यत तयारी
सावळीविहीर आरोग्य केंद्र झाले कोविड सेंटरमय

सावळीविहीर |वार्ताहर| Savlivihir

राहाता तालुक्यातील सहा गावाचे सेंटर असलेले सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड लसीकरण व करोना तपासणीमुळे कोविड सेंटरमय झाले असून जनतेच्या सहभागातून लवकरच ऑक्सिजन यंत्रणा उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून करोना रुग्णांची धावपळ थांबून या ठिकाणीच प्राथमिक उपचार मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या आरोग्य केंद्रात शिंगवे, रूई, निमगाव, निघोज, सावळीविहीर खुर्द व बुद्रुक हे सहा गावे समाविष्ट आहे. तसेच शिर्डी, कोकमठाण व चांदेकसारे, सोनेवाडी येथील ही काही रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे येथे येणार्‍या रुग्णांचा वाढता आलेख आहे. या ठिकाणी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर गागरे हे कार्यत असून या ठिकाणी सुसज्ज असे प्रसुतिगृह आहे.

तसेच इतरही लसीकरण करण्यात या आरोग्य केंद्राचा शंभर टक्के सहभाग आहे. काल या ठिकाणी सर्व वयातील नागरिकांना कोविशिल्ड लसीकरण सुरू होवून सुमारे शंभर नागरिकांनी लसीकरण घेतले. तसेच उन्हाची तिव्रता असल्याने रांगेत उभे असणार्‍या नागरिकांची व्यवस्था व्हावी यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच करोनाची लागण झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास याच ठिकाणी उपचार व्हावेत म्हणून डॉ. श्रीधर गागरे् यांचे पुढाकारातून लोकसहभागाद्वारे सुमारे दोन लाख रुपये खर्चून ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्यात येत असून सुमारे बारा बेडवर रुग्ण उपचार घेऊ शकतील.

डॉ. गागरे म्हणतात मै हू ना...

काल एक महिला पेशंटची लोणी प्रवरा रूग्णालयात डिलीवरी झाली. नंतर तिची करोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्वरित त्या महिलेला डिस्चार्ज घ्यावयास फर्मावले असता घाबरलेल्या नातेवाईकांनी रात्री बारा वाजता डॉ. गागरे यांचेशी संपर्क साधला असता सकाळी पेशंटला माझेकडे सावळीविहीरला घेऊन या घाबरू नका ‘मै हू ना’ असा धीर तर दिलाच परंतु सकाळी उपचार करून तणावमुक्त केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com