पुणे विद्यापीठाकडून फी कपात

नगर जिल्ह्यातील 131 महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांना होणार लाभ ||करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी
पुणे विद्यापीठाकडून फी कपात
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे(Covid 19) निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शुल्क कपातीचा निर्णय (Fee deduction decision) घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) संलग्न सुमारे 131 महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय (Fee deduction decision) घेतला होता. दुर्दैवाने ज्या विद्यार्थ्यांनी करोनामुळे आपले पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी 100 टक्के शुल्क माफ (100 % Fee waived) करण्यात आले असल्याचे विद्यापिठातर्फे सांगण्यात आले आहे.

सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने (Department of Higher and Technical Education) फी मध्ये सवलत देण्याबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सोबत सादर केला होता. त्यानंतर कुलगुरूंनी समितीचा अहवाल स्वीकारला आणि शिफारसी मंजूर केल्या. त्यानुसार, विद्यापिठाने विविध अभ्यासक्रमांचे शुल्क कमी केले.

दरम्यान, करोना काळात ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत त्यांना फीमध्ये 100 टक्के सवलत देण्यात आली आहे. ही फी मध्ये कपात केवळ शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी लागू करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरता येणार आहे. वसतिगृह/ निवास शुल्क तेव्हाच लागू होईल जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com