सावेडीत सुगंधी तंबाखूचा साठा जप्त

अप्पर अधीक्षक यांच्या विशेष पथकाचा छापा
सावेडीत सुगंधी तंबाखूचा साठा जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या मावा निर्मिती कारखान्यावर अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या छाप्यात सुगंधी तंबाखू व तयार मावा असा 67 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सावेडीच्या श्रीराम चौकातील संदेशनगरमध्ये गुरूवारी ही कारवाई करण्यात आली. पथकाने जप्त मुद्देमाल तोफखाना पोलिसांकडे जमा केला असून गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न प्रशासन विभागाला पत्र दिले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.

अप्पर अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापेमारी करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केली आहे. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील संदेशनगरमध्ये सुगंधी तंबाखूपासून मावा निर्मिती केली जात असल्याची माहिती अप्पर अधीक्षक अग्रवाल यांना मिळाली होती. त्यांनी विशेष पथकाचे निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवून सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी सुगंधी तंबाखू व तयार मावा पोलिसांना मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करून तोफखाना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. तसे पत्र अन्न प्रशासन विभागाला देण्यात आले आहे. अन्न प्रशासन विभागाने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com