सावेडीत किराणा दुकानाला आग

दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान
सावेडीत किराणा दुकानाला आग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडीतील (Savedi) श्रमिकनगर (Shramiknagar) येथील एसआर किराणा दुकानाला (SR Grocery Store) बुधवारी सकाळी आग (Fire) लागली. तळ मजल्यावर असलेल्या किराणा दुकानाला लागलेली (SR Grocery Store) आग (Fire) काही वेळातच दुसर्‍या मजल्यापर्यंत पोहचली. दुकानाच्या तिसर्‍या मजल्यावर दुकान मालकाचे कुटुंब राहते. घरामध्ये आठ व्यक्ती होत्या. आग (Fire) वेळीच लक्षात आल्याने आणि ती विझवल्याने त्या व्यक्ती सुखरूप आहेत. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान (Loss) झाले.

महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग पाणी शिंपडून विझवली. दुकानातून आगीचे लोट बाहेर आल्यानंतर आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशी यांनी आग विझवण्यासाठी मोठी मदत केली. सुरूवातीला तळमजल्यावर असलेल्या किराणा दुकानाला आग लागली. त्यानंतर आग दुसर्‍या मजल्यापर्यंत पोहचली. दुकानाच्या तिसर्‍या मजल्यावर घरामध्ये आठ व्यक्ती होत्या. धूर तिसरा मजल्यापर्यंत पोहोचला होता. तेथे असलेल्या सर्व व्यक्ती सुखरूप आहे. मात्र आगीमुळे दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.