सावेडीतील वेश्या व्यवसायावर छापा

सावेडीतील वेश्या व्यवसायावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील सूर्यानगर परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. दोन महिलांसह व्यवसाय चालवणार्‍या एकास ताब्यात घेतले आहे. तर एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग व तोफखाना पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी ही कारवाई केली. सूर्यानगर परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली. यात वेश्याव्यवसाय चालवणार्‍या एका व्यक्तीसह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. चार ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com