सावेडीतील मेडिकल एजन्सी चालकाला नोटीस

गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त प्रकरण
सावेडीतील मेडिकल एजन्सी चालकाला नोटीस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी परिसरात जप्त केलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांच्या साठा प्रकरणी सावेडीतील संबंधित मेडिकल एजन्सीचालकाला औषध प्रशासनाने नोटीस बजावून म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे औषध निरीक्षक जावेद शेख यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय वापरण्यास बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा एमआयडीसी परिसरात जप्त करण्यात आला होता. एका ट्रान्सपोर्ट कंपनीत आलेला हा एकूण 900 कीटचा म्हणजे साडेचार हजार गोळ्यांचा साठा होता. एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासन यांनी ही कारवाई केली होती. वैद्यकीय सल्ल्याशिवाय होणार्‍या गर्भपातासाठी या गोळ्यांचा प्रामुख्याने वापर होत असल्याने मेडिकल दुकानांत छुप्या पद्धतीने विक्री करण्यासाठीच हा साठा आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दरम्यान, या गोळ्या सावेडीतील एजन्सीच्या नावे आलेल्या आहेत. त्यामुळे या एजन्सीच्या मालकास औषध प्रशासनाने रितसर नोटीस बजावून एका दिवसात म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. तसेच गोळ्यांचा साठा जप्त केल्यानंतर त्याच दिवशी औषध प्रशासनाकडून तपासणीसाठी गोळ्यांचे नमुने औरंगाबादच्या फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.