
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहरातील सावेडी (Savedi) उपनगरात वेगवेगळ्या ठिकांनी हुक्का पार्लरवर (Hookah Parlour) तोफखाना पोलिसांनी छापा (Topkhana Police Raid) टाकून 25 हजारांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. बालिकाश्रम रोड येथे न्यू आर्टस कॉलेजच्या समोर, झक्कास वडापावच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर एका पत्राच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लवर पोलिसांनी छापा (Police Raid) टाकला.
अमिन इकबाल शेख (वय-21. रा. शिवाजी नगर कल्याण रोड मोहटादेवी मंदीराजवळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा 5 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर दुसरी कारवाई सोनानगर चौकापासून पुढे हॉटेल विराम शेजारील सुरु असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या हुक्का पार्लवर (Hookah Parlour) कारवाई करण्यात आली.
ऋषिकेश सतिष हिंगे (वय-21, रा. पंचशील नगर, मातोश्री उद्यान अ.नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तिसरी कारवाई नगर-मनमाड हायवेवरील पंचशील हॉटेलच्या बेसमेंटमध्ये स्मोक अॅण्ड फेल्म हुक्का पार्लरवर छापा (Hookah Parlour Raid) टाकून 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत जालिंदर शेलार यांच्याव तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.
तर सुरभि हॉस्पिटलजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लवर कारवाई करण्यात आली. फैजान कुतुबुद्दीन जमादार (रा. गुलमोहर रोड) यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 10 हजार 300 रुपयांचा हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधूकर साळवे यांना सावेडी (Savedi) उपनगरात अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु असल्याचे खात्रिशिर माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पथकास दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, पोलीस कर्मचारी दत्तात्रय जपे, अविनाश वाघचौरे, सचिन जगताप, सतीश भवर यांच्या पथकाने शहरात चार ठिकाणी हुक्कापार्लवर छापा (Hookah Parlour Raid) टाकून एकूण सुमारे 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.