सावेडीत गॅस रिफिलिग सेंटरवर छापा

दोघांविरूध्द गुन्हा || अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रिक्षांमध्ये अनाधिकृतपणे इंधन म्हणून घरगुती गॅस भरून देणार्‍या गॅस रिफिलिग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली की, सावेडीतील सोनानगर उपनगरात हॉटेल जगदंबा खानावळ आणि ताज मटण शॉपच्या पाठीमागे मोकळ्या जागेत रिक्षांमध्ये अनाधिकृतपणे गॅस भरला जात आहे. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद मुजावर यांना कारवाईचे निर्देश दिले. सहाय्यक निरीक्षक मुजावर आणि गुन्हे शोध पथकाने मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पंचासमक्ष सोनानगर भागात छापा टाकला.

त्यावेळेस सनी दत्ता शिंदे (वय 20, रा. वैदूवाडी, सावेडी) हा मार्शल कंपनीच्या सहाय्याने रिक्षा (एमएच 12 बीसी 1209) मध्ये गॅस भरत होता. सनी शिंदे आणि रिक्षा चालक गोरखनाथ मोहनराव राऊत (वय 62, रा. प्रेमदान हाडको) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. गॅस रिफिलिग मशिन, रिप्लिगं पिस्टल नोझल, भारत आणि इण्डेन गॅस असा दोन लाख 41 हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस अंमलदार सतीश साहेबराव त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सनी शिंदे आणि गोरखनाथ राऊत यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com