सावेडीतील बंद कचरा डेपोला पुन्हा आग

झाडे, ठिबक सिंचन जळून खाक
सावेडीतील बंद कचरा डेपोला पुन्हा आग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या तपोवन रोडवरील बंद करण्यात आलेल्या सावेडी कचरा डेपोत शनिवारी भीषण आग लागली. डेपोलगत असलेल्या महावितरणच्या सब स्टेशनच्या गेटलाही आगीची झळ बसली. मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

मागील दोन वर्षांपासून सावेडी येथील कचरा डेपो बंद करण्यात आलेला आहे. या डेपोत कचरा संकलनही बंद आहे. मात्र डेपोत जुना कचरा अद्यापही तसाच पडून आहे. तसेच गवतही वाढलेले आहे. डेपो चा प्रवेशद्वाराजवळील गवताला आग लागली वार्‍यामुळे डेपोतील गवताला व जुन्या कचर्‍यापर्यंत ही आग पसरली. आगीमध्ये झाडे, तसेच ठिबक सिंचनसाठी केलेली पाईपलाईन जळून खाक झाली आहे.

दरम्यान, कचरा डेपो शेजारी असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनच्या गेटपर्यंत आगीची झळ बसली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाचे वाहनचालक सी. आर. भांगरे, पांडुरंग झिने, श्री. माडगे आदींसह कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com