सावेडी कचरा डेपोत करोना मृतांवर अंत्यविधी

जिल्हाधिकार्‍यांसह आ. संग्राम जगताप यांनी केली पाहणी
सावेडी कचरा डेपोत करोना मृतांवर अंत्यविधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मृत करोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे नालेगाव अमरधाम येथे अंत्यविधीसाठी व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. करोना रूग्णांचा अंत्यविधी करण्यासाठी वेळ लागत आहे. यामुळे सावेडी येथील कचरा डेपो येथे मृत रूग्णांवर अंत्यविधी केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे समवेत सावेडी कचरा डेपो येथे पाहणी करून करोना रूग्णांवर अंत्यविधी करण्यासाठी सुचना दिल्या. सोमवारी कचरा डेपोच्या शेड मधील साफ सफाई करून अंत्यविधीला सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, विद्युत विभाग प्रमुख राजेंद्र मेहेंत्रे, घनकचरा व आग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उपायुक्त यशवंत डांगे यांनी काल पासून सावेडी कचरा डेपो परिसराची स्वच्छता मोहिम हाती घेवून शेड मधील साफ सफाई तसेच अग्निशामक बंबाच्या पाण्याने धुवून स्वच्छ केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com