सावेडी परिसरात फटाक्यामुळे लागली घराला आग

सावेडी परिसरात फटाक्यामुळे लागली घराला आग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवारी ऐन दिवाळीच्या दिवशी सावेडी परिसरातील नागरिक लक्ष्मीपूजन करत असतांना येथील खंडोबा मंदिराच्या शेजारील घराला फटाक्यामुळे आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसून अग्निशमन दलाने तातडीने येऊन ही आग आटोक्यात आणली.

रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून फटाक्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. येथील बसपाचे संतोष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्परता दाखवत लवकर येऊन ही आग त्वरित विझवली यामुळे मोठा अनर्थ टळला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com