अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरामध्ये सोमवारी सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच दिवशी चार ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या.

सकाळी साडेअकरा वाजता बालिकाश्रमरोडवरील गायकवाड मळ्यात तर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पारिजात चौक, प्रोफेसर चौकात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या.

शुभांगी कृष्णा गोसावी (वय 60 रा. बालिकाश्रमरोड, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता देवदर्शनासाठी बाहेर पडल्या होत्या. चिंतामणी हॉस्पिटलच्या पाठीमागील रोडवरून त्या जात असताना दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे गंठण चोरून नेले.

सोनसाखळी चोरट्यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पारिजात चौक व त्यानंतर प्रोफेसर चौकात दोन महिलांच्या गळ्यातील दागिणे लंपास केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी पथकासह धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला होता.

दरम्यान नव्याने विकसीत होत असलेल्या सावेडी उपनगरामध्ये सानसाखळी चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मागील आठवड्यात दोन दिवसामध्ये चार ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. यानंतर पोलिसांनी चोरीच्या घटना रोखण्यासाठी जनजागृतीवर भर देत चौका- चौकात फलक लावले होते. सोमवारी पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घालत पोलिसांना आव्हान दिले आहे.