सावेडीतील स्मशानभूमीसाठी भूसंपादनचा विषय अजेंड्यावर

महापालिकेची 25 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभा
सावेडीतील स्मशानभूमीसाठी भूसंपादनचा विषय अजेंड्यावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शुक्रवार, 25 नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या (Municipal Corporation) सर्वसाधारण सभेचे (General Assembly) आयोजन करण्यात आले आहे. महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. यात सावेडी भागात दफनभूमी व स्मशानभूमी (Burial Grounds and Cemeteries) उपलब्ध करून देण्यासाठी भूसंपादन (Land Acquisition) करण्याचा विषय घेण्यात आला आहे.

सावेडीतील स्मशानभूमीसाठी भूसंपादनचा विषय अजेंड्यावर
नगर भविष्यातील लॉजिस्टीक कॅपीटल

सभेत जिल्हा नियोजन समितीमार्फत (District Planning Committee) अग्निशमन विभागाकरीता लागणारी साधन सामुग्री खरेदीसाठी निधी मिळणे, स्थायी समितीच्या (Standing Committee) शिफारसीनुसार पुनर्विनियोजन अंदाजपत्रक तरतुदीला मंजुरी देणे, 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून कामे मंजूर करणे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रस्तावित विकास कामांना तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Department of Public Works) मनपाने भरलेली 12.50 लाख रुपये रक्कम मनपाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव देणे, 70 व्या वरिष्ठ गट पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेस निधी देणे, सावेडी भागात दफनभूमी व स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यासाठी भूसंपादन करणे आदी विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.

सावेडीतील स्मशानभूमीसाठी भूसंपादनचा विषय अजेंड्यावर
पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र
सावेडीतील स्मशानभूमीसाठी भूसंपादनचा विषय अजेंड्यावर
पाच विभागांवर बरसले पालकमंत्री

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com