भरदुपारी फ्लॅट फोडून 52 हजारांचा ऐवज लंपास

गावडे मळ्यातील घटना : तोफखान्यात गुन्हा
भरदुपारी फ्लॅट फोडून 52 हजारांचा ऐवज लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भरदुपारी फ्लॅट फोडून (Flat Robberry) सोन्याचे दागिणे (Gold jewelry), रोख रक्कम असा 52 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सावेडी (Savedi) उपनगरातील गावडे मळ्यात सोमवारी 11 ते 2 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहनकुमार अजयप्रसाद बर्नवाल (वय 39 रा. गावडे मळा, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी बर्नवाल गावडे मळ्यातील संस्कृती रेसीडेन्सीमध्ये 7 नंबरच्या फ्लॅटमध्ये राहतात. सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे डोअर लॉक केले होते. 11 ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे डोअर लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानांची उचकापाचक करून सोन्याचे दागिणे (Gold jewelry), रोख रक्कम असा 52 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

फिर्यादी यांना दोन वाजता चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक राऊत करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com