
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घर बंद करून पती-पत्नी कामावर गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. सावेडी उपनगरातील यशोदानगर परिसरात गुरूवारी दुपारी ही घरफोडी झाली. सव्वा तीन तोळे सोन्याचे दागिणे, चांदी, 15 हजार रूपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुयोग दत्तात्रय कुरूंद (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुरूंद एमआयडीसी येथे तर त्यांची पत्नी खासगी रूग्णालयात नोकरी करतात. गुरूवारी सकाळी साडेआठ दरम्यान दोघेही कामावर गेले होते. सायंकाळी साडेसहाला घरी आलेे असता त्यांना दरवाजाला कुलूप दिसले नाही. त्यांनी घरात पाहणी केली असता बेडरूममधील कपाटातील दागिन्यांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी एक तोळ्याची चेन, अर्धा तोळ्याचे कानातले, दीड तोळ्याची अंगठी, तीन ग्रॅमचे मणी, चांदीची चेन, देवीची मूर्ती आणि रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. तोफखाना पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.