
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
घरासमोर लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने माय-लेकांना मारहाण केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी वैदूवाडी येथे घडली. याप्रकरणी बाबासाहेब मच्छिंद्र शिंदे (वय 20, रा. वैदुवाडी, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या घरासमोर राहणार्या कृष्णा मरुती शिंदे याने त्याची मोटारसायकल फिर्यादीच्या घरासमोर लावली होती. त्यामुळे अडचण झाल्याने फिर्यादीने मोटारसायकल काढण्यासाठी त्याला सांगितले. त्याने नकार देत ही जागा तुझी आहे का, याचा सातबारा तुझ्या नाव वर आहे का, असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादीची आई लता शिंदे या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता मोटाबाई कृष्णा शिंदे, आशाबाई रवी शिंदे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून न शिवीगाळ केली. कृष्णा मारुती शिंदे, मोटाबाई कृष्णा शिंदे, आशाबाई रवी शिंदे (सर्व रा. वैदुवाडी) यांनी फिर्यादी व त्यांची आई लता शिंदे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोना अमोल आव्हाड करत आहेत.