सौंदाळा सोसायटीच्या 12 जागांसाठी दोन गटांत सरळ लढत

सौंदाळा सोसायटीच्या 12 जागांसाठी दोन गटांत सरळ लढत

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील सौंदाळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत लोकसेवक ग्रामविकास पॅनल व ज्ञानेश्वर शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होत आहे. गावपातळीवरील असली तरी दोनही गटांनी फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ही निवडणूक सोशल मीडियावर नेली आहे.

सौंदाळा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी दि.2 जानेवारी रोजी मतदान होत आहे.या निवडणुकीत एकूण 378 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दोन्ही गटांत जोराची चुरस लागून आहे.

लोकसेवक ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व शरद आरगडे, बाळासाहेब आरगडे, मिनीनाथ आरगडे व हरिभाऊ आरगडे हे करीत असून निवडणूक रिंगणात असलेल्या या पॅनलचया उमेदवारांमध्ये सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी- अशोक काशिनाथ आरगडे, उत्तम लक्ष्मण आरगडे, कल्पना बाळासाहेब आरगडे, मिनिनाथ विष्णू आरगडे, योगेश बाबासाहेब आरगडे, सोन्याबापू कुशिनाथ आरगडे, हरिभाऊ कारभारी आरगडे, बाळासाहेब रामा चामुटे. तर महिला प्रतिनिधी - अलका अशोक आरगडे व मंगल भागवत आरगडे. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी-शरद बाबुराव आरगडे अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी- हरी वामन बोधक यांचा समावेश आहे.

ज्ञानेश्वर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व सोसायटीचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव आरगडे, राजेंद्र चामुटे, बंडू आरगडे, नारायण आरगडे, ताराचंद बोधक, रामभाऊ चामुटे हे करीत असून निवडणूक रिंगणात असलेले या पॅनलचे उमेदवार असे... सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी- वसंत मनोहर आरगडे, राजेंद्र जनार्दन चामुटे, आशाबाई एकनाथ आरगडे, बंडू जालिंदरआरगडे, चांगदेव आसाराम आरगडे, अशोक रामभाऊ चामुटे, रामराव शंकर आरगडे, चंद्रकांत नानासाहेब आरगडे. महीला प्रतिनिधी-अनिता संतोष आरगडे व वैजंता कैलास आरगडे.इतर मागासवर्गीय प्रतिनिधी- अंबादास सुधाकर आरगडे. अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी- दिलीप ताराचंद बोधक .

दोन्ही गटांकडून गडाख-घुलेंच्या फोटोंचा वापर

सौंदाळा गावात वेगवेगळ्या विचारांचे व पक्षांचे कार्यकर्ते असले तरीही दोन्ही गटांनी आपापल्या गटाच्या प्रचारासाठी तयार केलेल्या मतपत्रिका नमुन्यावर शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख व राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे फोटो छापल्याने नेमकं कोण कोणत्या नेत्याचा आहे हे सर्वसामान्य मतदाराला समजणे अवघड झालेले आहे.

भटके-विमुक्तची जागा रिक्त...

सौंदाळा गावात मूळ रहिवाशी असलेला भटके-विमुक्त प्रवर्गातील नागरिक अथवा संस्थेचा सभासद नाही. मात्र भेंडा बुद्रुक येथील पंढरीनाथ मिसाळ हे सौंदाळा सोसायटीचे सभासद आहेत. त्यांनी ज्ञानेश्वर शेतकरी विकास पॅनलकडून भटके-विमुक्त राखीव जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मिसाळ हे भेंडा बुद्रुक सेवा संस्थेचे थकबाकीदार असल्याची हरकत लोकसेवक ग्रामविकास पॅनलने घेतल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने ही जागा रिक्त राहिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com