सौंदाळा शिवारात धूम स्टाईलने प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण चोरले

दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
सौंदाळा शिवारात धूम स्टाईलने प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण चोरले

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

मोटारसायकलवरुन धूम स्टाईलने आलेल्या दोघांनी प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण हिसका मारुन चोरुन नेल्याची घटना नेवासाफाटा ते भेंडा दरम्यान सौंदाळा गावच्या शिवारात घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौंदाळा शिवारात धूम स्टाईलने प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण चोरले
शहाणपण शिकवू नका

याबाबत ज्योती सुभाष काळे (वय 32) रा. भेंडा बुद्रुक यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी भेंडा येथील जिजामाता कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे. शनिवार 3 डिसेंबर रोजी कॉलेज सुटल्यानंतर मी दुपारी दोन वाजण्याचे सुमारास नेवासा फाटा, नेवासा येथे हॉस्पिटलला व माझे शेजारी राहणारी अलका केशव घोडके यांना सोबत घेवून माझे अ‍ॅक्टीव्हा (एमएच 16 सीएन 9813) गाडीवर गेले होते.

सौंदाळा शिवारात धूम स्टाईलने प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण चोरले
निळवंडेसाठी गौण खनिजे उपलब्ध करून द्या

आम्ही आमचे काम आवरुन नेवासा फाटा ते भेंडा रोडने भेंडा गावाकडे येत असताना सौंदाळा गावाचे शिवारात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आठरे यांचे हॉटले जयराजश्रीचे समोरील रस्त्यावर आमचे पाठीमागून आलेल्या तोंडाला काळे मास्क घातलेल्या तरुणांनी माझे गळ्यातील 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण हिसका मारुन तोडून घेवून बळजबरीने चोरुन नेले आहे. या फिर्यादीवरुन दोघा अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यत आला आहे.

सौंदाळा शिवारात धूम स्टाईलने प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण चोरले
4 हजार मंजूर घरकुलांना हवी जागा

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com