सात्रळ दूध टँकर लुटल्याची ‘बनवाबनवी’ उघड
सार्वमत

सात्रळ दूध टँकर लुटल्याची ‘बनवाबनवी’ उघड

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

सात्रळ दूध डेअरीचा टँकर लुटला हा बेबनाव असून कोणाच्या तरी सांगण्यावरून टँकरचालकाने हा बहाणा केला आहे. खुद्द टँकरच्या मालकांनीच अशी घटना घडली नसल्याचे सांगितल्याने ही बनवाबनवी समोर आली आहे.

टँकर लुटीचा कोणताही गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात दाखल नसून गुन्हा घडलाच नाही. कोणत्याही चेअरमनवर गुन्हा दाखल झाला नसून कोणतीही पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ या घटनेत आढळून आली नसल्याची स्पष्टोक्ती टँकरमालकाने दिली आहे. केवळ प्रसिद्धीचा खटाटोप तसेच कुणाला तरी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्य हेतूने खोटेनाटे कुभांड रचून चालकालाही यात सामील करून घेण्याचे हे उद्योग आहेत, असेही या टँकरच्या मालकांनी स्पष्ट केले आहे.

जो टँकर लुटल्याचा बेबनाव करण्यात आला, तो माझ्या मालकीचा आहे. संबंधित टँकरचालक मालक या नात्याने मला अगोदर माहिती देऊन नंतर पोलिसांना माहिती देईल. मात्र, या कपोकल्पित घटनेत ज्याचा टँकर लुटला, त्या टँकरमालकालाच ही घटना माहिती नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधित पोलीस ठाण्यात चौकशी केली असता माझ्या टँकरबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे ही घटना म्हणजे एक बेबनाव असल्याचे टँकरमालकाने स्पष्ट केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com