शिर्डीच्या प्रसादालयात ‘इतके’ भाविक महाप्रसादाने तृत्प

शिर्डीच्या प्रसादालयात ‘इतके’ भाविक महाप्रसादाने तृत्प

शिर्डी (प्रतिनिधी)-

राज्य शासनाच्या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले असून दिनांक 16 ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत 91 हजार 136 साईभक्तांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तर या काळात

श्री साई प्रसादालयामध्ये सुमारे 1 लाख 10 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

कान्हूराज बगाटे म्हणाले, सध्या करोना विषाणुची साथ चालु असून करोना विषाणुच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने दिनांक 17 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले होते. राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अजुन करोना विषाणुचे सावट संपले नसल्यामुळे श्रींच्या दर्शनाकरीता सामाजिक अंतराचे पालन करुन ठरावीक संख्येनेच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच शिर्डी येथे श्रींच्या दर्शनाकरिता यावे. तसेच पालखी मंडळाचे पदाधिकार्‍यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्याचे टाळावे, असे आवाहन साईभक्तांना श्री साईबाबा संस्थानच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

दिनांक 16 ते 27 नोव्हेंबर 2020 याकालावधीत 91 हजार 136 साईभक्तांनी ऑनलाईन, टाइम बेस व सशुल्क दर्शन पासेसच्या माध्यमातुन साईदर्शनाचा व श्री साईप्रसादालयामध्ये सुमारे 1 लाख 10 हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तसेच या कालावधीत संस्थानचे साईआश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांव्दारे 21 हजार 124 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com