
मुंबई -
राज्यातील 19 जिल्हा परिषदा आणि 27 पंचायत समित्यांमधील 60 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 18 फेब्रुवारी 2021 रोजी
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी दिली.
अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी अकोले तालुक्यातील सातेवाडी तर पंचायत समितीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, अकोले तालुक्यातील सातेवाडी येथील रिक्तपदांसाठी पोटनिवडणुक होणार आहे.